विदर्भातील पाणीटंचाईवर सौरऊर्जेचा तोडगा – बाभळी गावाचा आदर्श उपक्रम!

विदर्भातील पाणीटंचाईवर सौरऊर्जेचा तोडगा – बाभळी गावाचा आदर्श उपक्रम!

उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागतात.

आणि महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागते.

मात्र यावर उपाय शोधत अकोल्यात पातूर तालुक्याच्या बाभूळगाव गटग्रामपंचायतने बाभळी गावात सौर

Related News

उर्जेचा वापर करत पाण्याची स्वतंत्र टाकी बसवल्याने गावात पाणी टंचाई नाहीशी झाली आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला भटकंती करताना अगदी सहज आढळतात,

आणि हे चित्र प्रत्येक वर्षीच असते. मात्र यावर कुठे कायमचा उपाय केलेलं उदाहरण दिसत नाही.

मात्र अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाभूळगाव गटग्रामपंचायतीने यावर कायमचा उपाय शोधला आहे.

बाभूळगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाभळी गावावर पाणी टंचाईचे सावट प्रत्येकवर्षी घोंगावत होते.

गावातील महिला शेतातील आणि घरातील कामे आटोपून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकायची,

गावातील ही समस्या ग्रामपंचायतसाठी चिंतेची बाब झाली होती. मात्र यावर कायमचा उपाय निघेना,

नंतर केंद्र शासनाच्या सौरऊर्जेची कल्पना सुचली. आणि ग्रामपंचयातमध्ये एकमताने सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याची टाकी बसवण्याच ठरलं.

गावात जलजीवन मिशन अंतर्गत बोअर खोदून त्या शेजारी टाकी उभी राहिली.

ग्रामीण भागात वीजपुरवठा नियमित नसल्याने विजेची चिंता होती, तीही सौरऊर्जेच्या माध्यमातून दूर झाली.

आता बाभळी या गावात ४,००० लिटरक्षमतेची पाण्याची टाकी उभारली गेली आहे. या टाकीवर सौरऊर्जा पंप व सौरपॅनेल बसवण्यात आले आहे.

पाण्याची नियमितता राखण्यासाठी लोखंडी स्टँडवर ही टाकी उभारण्यात आली आहे.

केवळ एका बटणावर आता संपूर्ण गावात पाणी पुरवठा सुरू होतो. त्यामुळे ग्रामस्थ अत्यंत समाधानी आहेत.

गावाच्या चौकात असलेल्या अंगणवाडीसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी पंपाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हा प्रयोग इतर गावांसाठी हीप्रेरणादायी ठरू शकतो. पर्यावरण पूरक आणि शाश्वत

ऊर्जेचा वापर करत ग्रामस्थांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यात बाभूळगाव ग्रामपंचायतीने मोठे पाऊल उचलले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vinaparwana-chicken-matan-decorate-mahapalakachi-action-suru/

 

 

Related News