विद्यांचल द स्कूल अकोट येथे शिक्षक दिन साजरा

गुरु-प्रभव थीमअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांचा रंगारंग सोहळा

अकोट – दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोटमधील विद्यांचल द स्कूलमध्ये शिक्षक दिन (गुरुत्व) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘गुरु-प्रभव’ म्हणजेच गुरुचा असर या थीमवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या महत्वाचा गौरव करत आदर व्यक्त केला. या दिवशी स्वयंशासन दिनाचे कार्यक्रमही विशेष आकर्षण ठरले.

सकाळी सुरू झालेल्या कार्यक्रमात संचालिका सौ. सारिका भुतडा यांच्या प्रास्ताविकाने शिक्षकांचे कार्य व समाजातील स्थान अधोरेखित केले गेले. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, गाणी, प्रश्नमंजुषा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील आत्मीयता आणि स्नेह याचे उबदार चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते शिक्षकांसाठी आयोजित अतिथी सन्मान समारंभ. संचालक श्री. दिनेश भुतडा, सौ. सारिका भुतडा, प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी व प्रशासकीय प्रमुख श्री. प्रशांत विनायक यांच्या हस्ते प्रत्येक शिक्षकास भेटवस्तू व सन्मानचिन्हे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभवकुमार राऊत व सौ. रंजिता पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. मुजम्मिल आफताब यांनी केले.

शाळेच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम सुव्यवस्थीतपणे पार पाडला. शिक्षक दिनानिमित्त सकाळी ८:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांना नाश्ता व मिष्ठान्न भोजनही प्रदान करण्यात आले.

अंतिम सत्रात अध्यक्ष श्री. नरेश भुतडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि शिक्षकांना सन्मानचिन्हे व भेटवस्तू प्रदान करून गौरविले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. निलेश बरेठीया यांनी केले आणि राष्ट्रगीत गात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ही उत्सवधर्मि कार्यक्रम शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी एक प्रेरणादायी पर्व ठरली.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/bordit-ganesh-utsav-miravanuk-santate-and-excited/