विद्यांचल द स्कूल, अकोट येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

गुरु-प्रभवाची गूढ अनुभूती

अकोट: दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यांचल द स्कूल, अकोट येथे शिक्षक दिन (गुरुत्व) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या कार्यक्रमाची थीम होती ‘गुरु-प्रभव’, म्हणजेच शिक्षकांचा प्रभाव आणि योगदान. ४ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. त्याच दिवशी विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन दिनचे आयोजनही करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संचालिका सौ. सारिका भुतडा यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये शिक्षकांचे महत्त्व, त्यांची भूमिका व उद्देश याबद्दल माहिती देण्यात आली. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी संगीत, नृत्य, गाणी, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.विद्यार्थ्यांचा आदर पाहून शिक्षकांना आपल्या कार्याचा अभिमान वाटला. या कार्यक्रमासाठी शिक्षक सहकार्‍यांचे मार्गदर्शनही अत्यंत महत्त्वाचे ठरले. नृत्यात श्री. विनायक दाते, श्री. आशिष पंडागडे, रोहित नलोडे, प्रियदर्शनी दास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर संगीत सादरीकरणात श्री. धिरज अढाऊ, श्री. अभिजित वंडाळे, श्री. गौरव सुरतने, कु. श्रद्धा वानखडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे समन्वयन सौ. स्नेहल रावणकार, श्री. संकेत मुळे, सौ. धनश्री बन्ने, श्रीमती मृदुला सिन्हा, श्री. दिपक कांबळे व सौ. नेहा अग्रवाल यांनी केले.शाळा व्यवस्थापनाच्या वतीने ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षकांसाठी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत, नृत्य, गीत गायन तसेच खेळांचा समावेश होता. कार्यक्रम सकाळी ८:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होता. शिक्षकांसाठी नाश्ता व मिष्ठान्न भोजनाची सोयही करण्यात आली होती.संचालक श्री. दिनेश भुतडा, सौ. सारिका भुतडा, प्राचार्या डॉ. शैलजा त्रिवेदी आणि प्रशासकीय प्रमुख श्री. प्रशांत विनायक यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभवकुमार राऊत व सौ. रंजिता पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. मुजम्मिल आफताब यांनी केले.दिवसभर शिक्षकांना समर्पित नृत्य व उत्कृष्ट गीत सादर केले गेले, ज्यामुळे सर्व शिक्षक भारावून गेले. शिक्षकांच्या वर्षभर केलेल्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला भेटवस्तू व स्मृतिचिन्ह दिले गेले. संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेश भुतडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते सन्मानचिन्हे व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतासह झाली, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्री. निलेश बरेठीया यांनी पार पाडली.

read also : https://ajinkyabharat.com/telhara-municipal-council-chief-minister-opposition-union/