वीर भगतसिंग बचाव पथकाची शोधमोहीम सुरू

बैल धुण्यासाठी गेलेला युवक पेढी नदीत बुडाला

मुर्तिजापूर : खोळद येथील २३ वर्षीय शंतनु अविनाश मानकर हा आज सकाळी आपली बैलजोडी धुण्यासाठी पेढी नदीवर गेला

असता दुर्दैवाने वाहत्या पाण्यात वाहून गेला. ही घटना सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश  पिंपळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या सूचनेवरून कुरणखेड येथील वीर

भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने नदीत युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या मोहिमेत शहबाज शहा, दिनेश श्रीनाथ, शुभम दामोदर, अक्षय मोरे, मोहन वाघमारे, शेख मोईन, शेख नजिर आदी बचाव पथकाचे जवान सहभागी झाले आहेत.

तसेच माना पोलीस उपनिरीक्षक महाजन, मंडळ अधिकारी काळे, भोजने, पटवारी मोहड, भाजप बूथ प्रमुख मुकुंद गाडवे व स्थानिक नागरिकही घटनास्थळी उपस्थित आहेत.

सध्या युवकाचा शोधमोहीम सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/newly-appointed-gut-development-officer-pajai-yancha-hospitality/