वयाच्या चाळीशीतही दिसाल तरुण

वयाच्या चाळीशीतही दिसाल तरुण

वाढत्या वयानुसार त्वचेत बदल दिसू लागतात. विशेषत: वयाच्या 40 नंतर सुरकुत्या

येण्यासारख्या वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अशा परिस्थितीत त्वचेवरील सुरकुत्या

कमी करण्यासाठी तूम्ही घरात असलेल्या या गोष्टी वापरू शकता.

Related News

प्रत्येकाची इच्छा असते की आपली त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार असावी.

परंतू वातावरणातील बदल आणि वाढत्या वयामुळे त्वचेत बदल दिसून येतात.

वयाच्या 30 ते 40 व्या वर्षानंतर त्वचा सैल होऊ लागते आणि सुरकुत्या सारख्या वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

अशा परिस्थितीत तुमची त्वचा घट्ट ठेवण्यासाठी आणि वृद्धत्वापासून संरक्षण

करण्यासाठी तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टी वापरू शकता.

वयाच्या 40 व्या वर्षानंतर, सुरकुत्या, काळे डाग आणि कोरडी त्वचा यासारख्या समस्या सतावत असतात.

पण काही घरगुती उपयायांनी तुम्ही तुमची त्वचा तरूण आणि सुंदर बनवू शकता.

घरातील फक्त या गोष्टी मिक्स करून तुम्ही फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावा.

हळद आणि दुधाचा फेस पॅक

हळद ही एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे जी त्वचेला उजळ आणि ताजेतवाने करण्यास मदत करते.

तसेच दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे तुमच्या त्वचेला हायड्रेट करते आणि ती मऊ बनवते.

तर तुम्ही एक चमचा हळद घेऊन त्यात दोन चमचे दुध मिक्स करून पेस्ट तयार करा.

तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या.

नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक त्वचेला ओलावा आणि

चमक देतो आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करतो.

बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात जे त्वचेवरील काळे डाग हलके करण्यास मदत करतात.

याव्यतिरिक्त बटाट्यामध्ये स्टार्च आणिनरेंद अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला

चमकदार बनवण्यास देखील उपयुक्त ठरू शकतात. यासाठी तुम्ही बटाटा किसून त्याचा रस काढा.

हा रस चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या.

यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि डाग कमी होण्यास मदत होते.

आवळा आणि गुलाबजल

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

जे वृद्धत्व कमी करण्यास मदत करतात. तर गुलाबपाणी हे त्वचेला हायड्रेट करते करून ताजेतवानेपणा देते.

यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा आवळा पावडर

घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करूप पेस्ट बनवा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा. हा फेस पॅक तुमची त्वचा सुधारण्यास

तसेच घट्ट आणि तरुण बनविण्यात मदत करू शकते.

या गोष्टीही लक्षात ठेवा

या घरगुत‍ी उपायायांनी तूम्ही फेसपॅक तयार करून त्वचेवर लावल्याने त्वचा निरोगी तर राहीलच.

यासोबतच, योग्य आहार, व्यायाम, निरोगी जीवनशैली स्वीकारणे खूप महत्वाचे आहे.

याशिवाय तूम्ही कोणतेही स्किन केअर उत्पादन असो किंवा नैसर्गिक घटक असो,

ते नेहमी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार असले पाहिजेत. तसेच जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल

तर तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर लावणे टाळावे कारण ते तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.

आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/tumchaya-mithamadhyay-sodium/

Related News