“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”

“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”

प्रतिनिधी आलेगांव

आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील

कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी

Related News

पारंपरिक वेशभूषा करून वारकऱ्यांप्रमाणे दिंडीत सहभागी होत आनंदाचा उत्सव साजरा केला. ‘पांडुरंग’ आणि

‘रुक्माई’च्या रूपातील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फुगडी, गोल रिंगण, भजन कीर्तन, आणि विठोबाच्या ओवाळणीसह

शाळा परिसर भक्तिभावाने न्हाल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले. अध्यात्म, संस्कृती आणि सहभागातून साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेला साजेसे परिधान केले होते. योगेश कैलास गवळी (वर्ग 1 ली) याने विठ्ठलाची तर कु. जयश्री देविदास जाधव (वर्ग 3 री)

हिने रुक्माईची भूमिका साकारली. त्यांच्या वेशभूषेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. दिंडीमध्ये इतर विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, भगवे झेंडे,

वारीतील घोषवाक्ये आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात भाग घेतला परिसरात पारंपरिक वारी शाळेच्या आवारातून पारंपरिक दिंडी काढण्यात आली.

विद्यार्थ्यांनी टाळ-चिपळ्यांच्या तालावर अभंग गात “विठ्ठल-विठ्ठल”च्या गजरात वारी साकारली. विशेष म्हणजे विटेवर विठ्ठल उभा करून त्याची विधिवत पूजा करण्यात आली.

कार्यक्रमात शिस्त, भक्तिभाव आणि एकात्मता दिसून आली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य नारायण वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक. नितीन चेके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता इंगळे कवर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिकांनी

दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत फुगडी खेळत, वारकरी परंपरेचा आनंद लुटला.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी फुगडी आणि गोल रिंगण खेळून आनंद घेतला. विविध धार्मिक व सांस्कृतिक गीतांनी वातावरण भक्तिरसात न्हालं.

पारंपरिक वेशात सजलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून वारकरी परंपरेची खरी अनुभूती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती,

संस्कृती आणि समूहभावना रुजली. पारंपरिक सणांचे शैक्षणिक महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जाणीवेचा अनोखा अनुभव मिळाला.

उपस्थित पालक, शिक्षक आणि गावकरी यांच्यासाठीही हा कार्यक्रम एक भावनिक आणि अध्यात्मिक पर्वणी ठरली.

 

Read Also :  https://ajinkyabharat.com/aalegav-babhugaav-raasta-banala-daghatcha/

 

Related News