वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास खोळंबली

वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास खोळंबली

अकोला : प्रवाशांना मोठा मनस्ताप

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास थांबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस मुर्तिजापूर स्थानकात अडकली होती.

 मुर्तिजापूर ते बोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक ५९९/१२ जवळ मालगाडीचे कप्लिंग तुटले.

या घटनेमुळे नागपूर-भुसावळ अप मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

मालगाडीचा लोको पायलट प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारतच नव्हे तर इतर गाड्याही मार्गावर खोळंबल्या.

रेल्वे प्रशासनाने तात्काळ युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू केली. त्यानंतर मालगाडी हलवून मार्ग मोकळा करण्यात आला व वंदे भारत एक्सप्रेसला पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आलं.

या विलंबामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/dabki-road-vashi-yanchi-105-foot-lamb-kavad/