वनतारा प्रकरणात काय ठरलं ?

हत्ती प्रकरणावर न्यायालयाची भूमिका

मुंबई –  अनंत अंबानींच्या गुजरातमधील जामनगर येथील प्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र ‘वनतारा’संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ‘वनतारा’विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली आणि न्यायालयाने केंद्राला नियम पाळून हत्ती पाळण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट केले.याचिकेतील आरोपांमध्ये ‘वनतारा’ने भारतात आणि परदेशातून हत्ती आणल्याचे, तसेच बेकायदेशीर वन्यजीव हस्तांतरण केले असल्याचे म्हटले होते. 25 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. माजी न्यायाधीश जस्ती चेलामेश्वर यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने शुक्रवारी आपला अहवाल सादर केला.‘वनतारा’च्या बाजूने सादर केलेल्या अहवालावर न्यायालयाने म्हटले, “जर एखाद्या व्यक्तीने सर्व नियमांचे पालन करून हत्ती पाळले, तर त्यात गैर काय?” याचिकाकर्त्यांनी मंदिरातील हत्तींच्या देखभालीचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की, “तुम्हाला कसं कळतं की हत्तींची योग्य काळजी घेतली जात नाही?”न्यायालयाने स्पष्ट केले की, समितीचा अहवाल न्यायालयाने ठरवलेल्या प्रश्नांवर आधारित असल्याने त्याचा गैरवापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच आवश्यक सुधारणा अहवालानुसार करता येतील, असे न्यायालयाने नमूद केले.

read also : https://ajinkyabharat.com/rajat-patidar-has-central-jhonla-11-varsanantar-dulip-trophy-zincavoon-dili/