वनदेव येथे श्रीमद भागवत समाप्तीनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

वनदेव येथे श्रीमद भागवत समाप्तीनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

श्री क्षेत्र श्रीराम आश्रम वनदेव येथे श्रीमद भागवत समाप्ती तसेच महाप्रसाद

निमित्त भव्य आरोग्य तपासणी संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन श्रीराम आश्रम वनदेवचे

महंत नारायणदासजी महाराज यांनी केले शिबिराचे हे दुसरे वर्ष होते.

Related News

अकोला येथील तज्ञ् डॉक्टर मंडळी कडून शेकडो भक्तांची मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत

औषध वितरण करण्यात आले.यावेळी विशेष उपस्तिती भागवताचार्य श्री लक्ष्मणदासजी महाराज,

स्वामी अमोलानंद, श्री ह भ प संजय महाराज पाचपोर, इलोरा संस्थांनाचे ह भ प तुकाराम महाराज यांची होती.

तसेच तपासणी करिता अकोला येथील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ मंडळी उपस्थित होते.यामध्ये डॉ प्रणय महल्ले अस्थीरोग

तज्ञ्, डॉ स्वप्नील लाहोळे हृदय रोग मधुमेह दमा तज्ञ्, डॉ किशोर ढोणे मूळव्याध, भगंदर तज्ञ,

डॉ महेश देशमुख स्त्रीरोग तज्ञ्, डॉ मदन महल्ले बालरोग तज्ञ्, यांनी शेकडो भक्तांची तपासणी करून

त्यांना मार्गदर्शन केले दुर्गम भागात येत असलेले वनदेव हे गाव अगदी छोटे गाव आहे व त्या ठिकाणी खुप

जुने हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे त्या मंदिराचे जीर्णोद्धार महंत नारायणदासजी महाराज यांनी केले तसेच

परिसरातील असंख्य तरुण, पुरुष,महिला यांना भक्ती मार्गात आणले कुठलेही त्याठिकाणी

सुविधा नसताना त्या ठिकाणी एक एक सुविधा तयार करण्यात येत आहेत यानुसारच येथे

अखंड हरीनामा सोबतच भागवत समाप्ती निमित्त भव्य असे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

कारण येथील ग्रामीण भक्तांना आरोग्याबद्दल जनजागृती होऊन तज्ञ् डॉक्टरांचा मोफत लाभ

मिळावा महाराजांच्या या विनंतीस मान देऊन अकोला येथील सुप्रसिद्ध

तज्ञ् डॉ मंडळींनी समाप्ती निमित्त वेळ देऊन मोफत सेवा दिली.यावेळी परिसरातील रुग्णसेवक रक्षण देशमुख,विजय मुर्तडकर,

छोटु बाप्पू देशमुख, ऍड उमेश शिंदे,अरुण देवकते सर,मंगेश केणेकर,सतीश कोरकणे,

अशोक पदमने, जगदीश मुर्तडकर,दिगंबर महल्ले, गोपाल दि महल्ले, करण देशमुख.

सेवेकरी गजानन खुळे, सुखनंदन डाखोरे , सुरेश देवकते, गणेश कोरकणे,विलास देवकते,

सुपाजी लाहुळकर,बंडू भुरकाळे, सोपान डाखोरे, आदींचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/jillha-parishad-arogya-seva-employees-pasanthet-shiv-jayanti-enthusiast/

Related News