श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर माता वैष्णो देवी मंदिराकडे
जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी दुपारी मोठी दरड कोसळली.
या अपघातात ५ भाविकांचा मृत्यू झाला असून,
१४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरड कोसळल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून,
वैष्णो देवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार,
अर्द्धकुमारीजवळील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ दुपारी ३ वाजता ही दुर्घटना घडली.
हवामानाचा तडाखा :
सकाळपासूनच हिमकोटी मार्गावरील यात्रा बंद होती.
जुन्या मार्गावरील यात्रा दुपारी १.३० पर्यंत सुरू होती, पण मुसळधार पावसामुळे तीही थांबवावी लागली.
डोडा जिल्ह्यात ढगफुटीमुळे तवी नदीने रौद्ररूप धारण केले असून, चौथ्या तवी पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे.
डोडा परिसरात ४ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.
अधिकाऱ्यांचा इशारा :
जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून,
सखल व डोंगराळ भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अनेक घरांना आणि मालमत्तांना मोठे नुकसान झाले असून,
बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/kalyanamadhiil-khajgi-rugnalayacha/