भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 तीन सामन्यांची वनडे मालिका भारताच्या ताब्यात आहे. मालिकेतील दोन सामने पार पडले असून भारताने दोन्ही जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली आहे. आता तिसरा सामना फक्त औपचारिक राहणार आहे.दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने फलंदाजी करताना 49.4 षटकांत सर्व गडी गमवत 300 धावा केल्या. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला 301 धावांचे आव्हान दिले. मात्र प्रतिस्पर्ध्यांचा डाव गडगडला आणि ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकांत सर्व गडी गमवत 249 धावा केल्या. भारताचा विजय 51 धावांनी ठरला.भारताच्या डावात वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्राने आक्रमक खेळी करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चटकावून टाकले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. वैभव सूर्यवंशी 70 धावा करत बाद झाला. विहान मल्होत्राने 70 धावांची खेळी केली, तर अभिज्ञान कुंदूने 71 धावा करत संघाला मोकळा डाव दिला. कर्णधार आयुष म्हात्रे काही खास करू शकला नाही; त्याला आपलं खातेही उघडता आले नाही.विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले, मात्र जेडन ड्रेपरने 72 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 107 धावा करून संघाचा डाव सांभाळला. अखेर आयुष म्हात्रेने त्याची विकेट घेतली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 249 धावांवर आटोपला.तिसरा आणि अंतिम सामना 26 सप्टेंबरला होणार आहे, ज्यात फक्त औपचारिक निकालाची अपेक्षा आहे.
भारत अंडर-19 (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), राहुल कुमार, आर.एस. अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, किशन कुमार.
ऑस्ट्रेलिया अंडर-19 (प्लेइंग इलेव्हन): अॅलेक्स टर्नर, सायमन बज (विकेटकीपर), स्टीव्हन होगन, यश देशमुख (कर्णधार), अॅलेक्स ली यंग, जेडन ड्रेपर, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, केसी बार्टन, विल बायरम.
read also : https://ajinkyabharat.com/human-rights-commission-attack/
