“वैभव सूर्यवंशी IPL मध्ये – वय पाहून सगळे थक्क!”

14 वर्षांचा तुफान: IPL मध्ये जादूचे धमाके !

14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL कसा खेळला ? BCCIचा नवा नियम जाहीर

मुंबई – बिहारचा अवघा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी 2025 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळून चर्चेत आला. फक्त सात सामन्यांत त्याने 252 धावा करत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं. त्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं.रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) यावर चर्चा झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संजय नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला की इतक्या लहान वयात वैभव आयपीएलमध्ये कसा खेळला?यावर आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “वैभवला आयपीएल खेळण्याची परवानगी मिळाली कारण त्याने याआधी बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं होतं. जो कोणी खेळाडू रणजी किंवा लिस्ट-ए सामना खेळतो, तो वयाची मर्यादा न पाहता आयपीएलसाठी पात्र ठरतो.”

नवा नियम काय?

बीसीसीआयनं यानंतर स्पष्ट केलं की आता 16 वर्षांखालील किंवा 19 वर्षांखालील खेळाडू आयपीएल खेळू शकतात, पण त्यासाठी त्यांनी किमान एक प्रथम श्रेणी सामना किंवा लिस्ट-ए सामना खेळलेला असावा.या नियमामुळे भविष्यात अजून अनेक तरुण खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

read also :https://ajinkyabharat.com/kambi-mahagava-japa-shaet-vidyarthayana-bhetavastu-deon-anokha-vaddivas-sajra/

Related News

Related News