मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह १४ जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे,
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
तर दोन जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
किनारी जिल्ह्यांमध्ये धोक्याची घंटा
कोकणातल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह
मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे.
विशेषतः २३ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना जोरदार इशारा देण्यात आला आहे.
समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि शक्य असल्यास
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका
पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची
शक्यता असल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः प्रवाशांनी घाटमार्गांचा प्रवास टाळावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच मार्गक्रमण करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा कहर
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा,
नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट
आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान
होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता
या पावसामुळे शहरांत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, विजेच्या तारा,
झाडं पडण्याचे प्रसंग वाढू शकतात. नागरिकांनी झाडाखाली उभं राहणं टाळावं,
विजेच्या खांबांपासून दूर रहावं आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय योजावेत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchaya-panyachaya-threaters-bharata-bharatacha-sangat/