अकोट :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत वणी, वारुळा आणि तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये पांधण रस्ते विषयक मोहिमेचा ग्रामसभेत उत्साहात शुभारंभ झाला.
विशेष म्हणजे, भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाला एक राष्ट्रीय आणि प्रेरणादायी अधिष्ठान मिळाले.
या प्रसंगी अकोटचे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी नरेंद्र सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना पांधण रस्त्यांचे महत्त्व, शाश्वत विकासातील भूमिका तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
ग्रामसभेत तलाठी बंकेवार, तलाठी सौ. घुगे मॅडम, मंडळ अधिकारी अढाऊ, ग्रामसेवक खारोडे, सरपंच व सदस्यगण उपस्थित होते. तसेच वणी, वारुळा आणि तांदुळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ग्रामस्थांनी मोहिमेच्या यशासाठी सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे गावात पायाभूत सुविधांचा विकास होण्याबरोबरच ग्रामस्थांमध्ये एकात्मता आणि सहभागाची भावना अधिक दृढ होईल.
सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ग्रामविकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल ग्रामसभेला नवा उत्साह देणारे ठरले असून, पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य या कार्याला प्रेरणादायी अधिष्ठान प्रदान करणारे ठरले.
read also :https://ajinkyabharat.com/71-year-old-rupinder-kauracha-blood/