“उत्सव तान्हा बळीराजाचा” व्यंकटेश बालाजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा

व्यंकटेश

मुर्तीजापूर -व्यंकटेश बालाजी स्कूलमध्ये तान्हा पोळ्याच्या निमित्ताने “उत्सव तान्हा बळीराजाचा” हा कार्यक्रम

मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बालकांनी शेतकऱ्याचे जीवन, बैलांचे महत्त्व आणि परंपरेची ओळख सादर केली.

कार्यक्रमाची सुरुवात संस्था अध्यक्ष अवधूत ढेरे यांच्या हस्ते सरस्वती माता व व्यंकटनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व

दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री. बंडूभाऊ तोंडले यांनी सजवून आणलेल्या बैलजोडीचे पूजनही करण्यात आले.

अध्यक्ष अवधूत ढेरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय

नाही”.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तम वाव मिळाला.

  • पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मातीचे बैल सजवून पोळ्यात उभे केले.

  • तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी “आम्ही जातीचे शेतकरी, खातो कष्टाची भाकरी” या गाण्यावर नृत्य सादर केले.

  • तसेच शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांना विचार करायला लावले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अवधूत ढेरे होते. प्रमुख अतिथींमध्ये सचिव राजश्रीताई गोळे, मुख्याध्यापिका सारिका कडून व

पर्यवेक्षिका मिनाक्षी महाजन होत्या.कार्यक्रमाचे नियोजन प्रिती माटोडे व क्रिपाली वाघ यांनी केले. संचालन स्वाती गोंडचर यांनी

केले तर आभारप्रदर्शन किरण तिवारे यांनी केले. पोळ्याचे महत्त्व रुचिका दुबे व रोशनी नीहुल यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परंपरा, संस्कृती आणि शेतकरी जीवनाबद्दल जिव्हाळा निर्माण झाला.

Read also : https://ajinkyabharat.com/shetkyachaya-mulache-dreap/