मला सत्तेतून बेदखल करण्यासाठी अमेरिकेचं षडयंत्र -शेख हसीना

बांग्लादेश

बांग्लादेश हिंसाचारातून सावरत असताना माजी पंतप्रधान शेख हसीना

यांनी आता अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

मला सत्तेतून बेदखल करण्यासाठी कट रचला गेला.

Related News

अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळे मला सत्तेवरून दूर सारण्याचा

कट रचण्यात आल्याचे हसीनांनी म्हटले. या बेटामुळे अमेरिकेला

बंगालच्या उपसागरावर प्रभाव निर्माण करण्यास मदत झाली असती.

पण त्यांचे मनसुबे सफल न झाल्याने अमेरिकेने माझ्याविरोधात योजना आखली.

पण बांग्लादेशातील जनतेला आवाहन आहे की, यावेळी दिशाभूल करून घेऊ नये.’

शेख हसीना यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून संदेश पाठवला,

त्यात ही माहिती दिली आहे. शेख हसीनांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे.

संदेशात हसीना म्हणाल्या, ‘मला मृतदेहांची मिरवणूक बघावी लागू नये,

म्हणून मी राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर त्यांची सत्ता यायची होती,

पण मी तसे होऊ दिले नाही. मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

तर अवामी लीगच्या नेत्या हसीनांनी अमेरिकेसोबत झालेल्या

बोळवणीची देखील उक्ती केली आहे. ‘मी जर सेंट मार्टिन बेटाचे सार्वभौमत्व सोडले

असते आणि अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू दिले

असते तर मी सत्तेत राहू शकले असते. या परिस्थिती मी माझ्या देशातील

जनतेला विनंती करते की, कृपया कट्टरपंथीयांकडून च्या बोलण्याला बळी पडू नका.’

बांग्लादेश आंदोलनामुळे अस्थिर झाल्यानंतर शेख हसीनांनी

५ ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर बोलताना

‘मी देशात राहिले असते तर आणखी लोकांचे प्राण गेले असते आणि

अधिक संसाधने धुळीस मिळाली असती, त्यामुळे मी देश सोडण्याचा कठीण निर्णय घेतला.

जनतेने मला निवडून दिले म्हणून मला बांग्लादेशचे नेतृत्व करता आले.

जनता माझी ताकद आहे.’ अशा शब्दांत शेख हसीनांनी जनतेला संदेश दिला आहे.

तर अवामी लीगच्या हत्येचा मी निषेध करत आहे आणि मी लवकरच

देशात परतणार आहे, अशी ग्वाही देखील हसीनांनी दिली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/vinesh-phogtala-will-give-gold-medal/

Related News