नवी दिल्ली /
अकोला — “उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
” अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अकोला जिल्ह्यातील पातूर
नगरपालिकेला उर्दू फलक लावण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे.
भाषिक विविधतेचा सन्मान आवश्यक – सर्वोच्च न्यायालय
न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या निकालात म्हटले आहे की,
भाषिक विविधतेचा सन्मान करणे हे लोकशाहीतील मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे उर्दू अथवा इतर कोणत्याही
भाषेचा मराठीसह वापर केल्यास ते महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण (अधिकृत भाषा) कायद्याचा भंग ठरत नाही.
प्रकरणाची पार्श्वभूमी
अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या
फलकावर मराठीबरोबर उर्दू भाषेचा वापर करण्यात आला होता.
याविरोधात पातूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षा संजय बागडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टाने या फलकाच्या वापरास परवानगी दिल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, उर्दूवर कोणतीही बंदी नाही आणि तो फलक कायदेशीर आहे.
भविष्यासाठी सकारात्मक संदेश
या निकालामुळे भाषिक सौहार्द आणि विविधतेचा सन्मान करण्याचा संदेश न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाने म्हटले की, “उर्दूसह इतर भाषांशी मैत्री करूया, त्यांचा आदर करूया.
ही आपली सांस्कृतिक समृद्धी आहे.”
Read Also : https://ajinkyabharat.com/charita-training-atmchi-facility-fast-cash-express/