बाळापूर : तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत निंबा फाटा परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार धंद्यावर उरळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 39,510 रुपयांचा जप्त मुद्देमाल मिळवण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उरळ पोस्टेचे ठाणेदार पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी बावन तास पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या व्यक्तींचा ताबा घेण्यात आला. यामध्ये अमोल कोकाटे (वय 34, रा. निंबा), महादेव कोगडे (वय 35, रा. निंबा), रोहन शेगोकार (वय 28, रा. कवठा), साहेबराव टोपरे (वय 38, रा. कारंजा रमजानपूर) आणि पसार झालेल्या नागेश तायडे (वय 31, रा. हिंगणा) यांचा समावेश आहे.घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालात खेळण्याची रक्कम, डावातील साहित्य आणि अंगजडती यांचा समावेश होता. सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pantpradhan-chitrachal-10-important-issues/#google_vignette