Kolhapur News : उपसरपंचांची ‘हिट विकेट’! स्वतःच्या विरोधात मतदान करून गमावलं पद
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीत घडलेल्या विचित्र प्रकाराची सध्या राज्यभर चर्चा आहे.
उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील यांनी अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी चुकून स्वतःच्या विरोधातच मतदान केलं, परिणामी 10-0 अशा एकतर्फी निकालाने त्यांना पद गमवावं लागलं.
Related News
प्रकरण असं की, उपसरपंचांवर “आम्हाला विश्वासात न घेता काम” केल्याचा आरोप करत सात सदस्यांनी 6 ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट रोजी विशेष सभा घेण्यात आली. मतदानात सर्व 10 सदस्यांनी पाटील यांच्या विरोधात मत दिलं, त्यात स्वतः पाटील यांचंही मत होतं.
निकाल जाहीर झाल्यानंतर चूक लक्षात आल्यावर पाटील यांनी तहसीलदारांकडे फेरमतदानाची मागणी केली.
मात्र, तहसीलदारांनी ती मागणी फेटाळून, निकाल अंतिम असल्याचं सांगितलं आणि असमाधान असल्यास न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला.
या ‘हिट विकेट’ प्रकारामुळे खिद्रापूरपासून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/weather-alert-vidarbha-pudil-4-days-vigorous-pavasacha-gesture/