अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी..

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी..

चिखली (संदीप सावळे)

चिखली ते जालना शहरातील महाबीज दि. २३ जुलै च्या रात्री १० च्या सुमारास दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने

धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत असे की, प्रकाश नारायण गीते ( वय ३८ वर्ष, रा. हिवरा आश्रम, ता. मेहकर, जि. बुलढाणा )

हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीने चिखली वरून त्यांच्या हिवरा आश्रम या गावी रात्री १० च्या सुमारास जात असताना

त्यांच्या दुचाकीला महाबीज समोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली,

या धडकेत प्रकाश गीते हे गंभीर झाले. त्यांना स्थानिक नागरीकांनी जवंजाळ हॉस्पिटल मध्ये भरती केले.

परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे उपचारार्थ हलविण्यात आले.

अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या अपघाताचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/cancer-affected-mahileskat-non-representation-karanya-karchayalayala-shiva-senecha-danka/