कावड धारकांसाठी धारतीर्थाचे दरवाजे खुले

कावड धारकांसाठी धारतीर्थाचे दरवाजे खुले

केंद्रीयमंत्री ना. जाधवांच्या हस्तक्षेप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारींच्या आंदोलन इशाऱ्यामुळे पुरातत्व विभाग नरमला

लोणार, दि. २७ (प्रतिनिधी)

लोणार शहरासह विदर्भ व मराठवाड्याच्या शिवभक्तांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेले लोणार धारतीर्थ येथील पाणी अखेर

कावडधारकांना नेण्यासाठी खुले करण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला आहे,

विशेष म्हणजे कालच शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी आदींनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान, केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी हस्तेक्षप करून पुरातत्व विभागाचे आयुक्त अरूण मलिक यांच्याशी चर्चा केली.

याबाबींची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाने घेतलेला निर्णय त्वरित मागे घेण्यात आला.

धारातीर्थावर स्त्रान बंदीसह एक कावड भरून पाणी सुद्धा शिवभक्ताना नेता येणार नाही,

असा फतवा पुरातत्व विभागाने काढला होता. सदर आदेश पुरात्व विभागाने त्वरित रद्द करावेत,

अन्यथा चक्का जाम, लोणार बंद, असे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख

प्रा बळीराम मापारी, शिवसेना तालुका प्रमुख भगवान सुलताने, युवासेना तालुका प्रमुख गजानन मापारी,

शहर प्रमुख पांडुरंग सरकटे यांनी पुरातत्त्व विभागाला इशारा देत ५ ऑगस्टपर्यंत कावडधारकांसाठी धारातीर्थ खुले करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

या बाबीची गंभीर दखल घेत केंद्रीय आयुष्य व आरोग्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी पुरातत्त्व विभागाचे आयुक्त

अरुण मलिक यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आणि जनतेच्या संतापाचा उद्रेक टाळण्यासाठी

पुरातत्व विभागाने अनाठाई घेतलेले निर्णय त्वरित मागे घेऊन कावड धारकांना जलाभिषेक करण्यासाठी धारेचे

पाणी नेण्याची मुभा द्यावी, असे निर्देश दिले होते. या सर्व घडामोडींची दखल घेत पुरातत्व विभागाने

अखेर शिवभक्तांसमोर माघार घेत कावडधारकांना जलाभिषेक करण्यासाठी धारातीर्थचे पाणी नेण्यास मुभा दिली.

तसेच केंद्रीय आयुष्य व आरोग्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांचे विशेष आभार व्यक्त करून ना. जाधव यांच्या कणखर

भूमिकेमुळे आणि शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशारा पुढे पुरातत्व विभागाला नमते घेणे भाग पडले,

अभिषेकासाठी धारेचे पवित्र पाणी नेण्याची मुभा शिवभक्तांना मिळाल्यामुळे

लोणार शहरात आनंदाचे वातावरण आहे. श्रावण महिन्यात शिवभक्तांच्या होणाऱ्या गर्दीमुळे लोणार शहराचा

अर्थकारणाला सुद्धा मोठी चालना मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत.

पुरातत्व विभागाने मुभा दिल्यामुळे लोणार तालुक्यातूनच नव्हे तर बुलढाणा जिल्हा तसेच विदर्भ व मराठवाड्यातील

कावडधारी शिवभक्तांचे पाऊल लोणारच्या दिशेने मोठ्या उत्साहाने पडणार आहेत.

उद्या सोमवार तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात कावडधारी मोठ्या संख्येने लोणार शहरात येऊन आपापल्या गावातील

महादेवाच्या पिंडीला जलाअभिषेक करण्यासाठी धारेचे पवित्र गंगाजल घेऊन जाण्यासाठी वाजत गाजत यावे.

प्रा बळीराम मापारी, जिल्हा शिवसेनाप्रमुख

Read Also : https://ajinkyabharat.com/akolyache-adorable-divine-shri-rajarajeshwar-temple-today-shravan-mahinyachaya-pahila-somwari-bhavikanchi-mothi-gardi/