केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घराला
बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर पोलीसानी तातडीने तपासणी केली.
याशिवाय तात्काळ सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
पोलीस कंट्रोल रूमला रात्री कॉल करून एका इसमाने धमकी दिली होती.
पण, तपासणीत कोणताही संशयास्पद वस्तू किंवा पुरावा आढळला नाही.
मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थाना भोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीला नागपूरच्या सिव्हिल लाईन भागातून पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
तसेच ही व्यक्ती मानसिक तणावात असल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे.