UNGA सत्रात महत्त्वाची चर्चा

अमेरिकेत शहबाज–ट्रम्प भेटीची शक्यता, लष्कर प्रमुख असिम मुनीरसह पाकिस्तानचे प्रतिनिधित्व

संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ८० व्या सत्रात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल असिम मुनीर देखील शरीफ यांच्या सोबत असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज शरीफ येत्या २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. ही भेट युएनजीएच्या बैठकीच्या ठिकाणी नव्हे, तर वेगळ्या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगभरात सध्या वातावरण अस्थिर असतानाच भारत-पाकिस्तानचे संबंधही तणावग्रस्त आहेत. यावेळी पाकिस्तान आपली पूरस्थिती आणि इस्राईलवरील हल्ल्याचे जागतिक परिणाम यावर चर्चा करण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, यंदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला अनुपस्थित राहणार असून, त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करतील. परराष्ट्र मंत्री जयशंकर २७ सप्टेंबर रोजी युएनजीए बैठकीत भारताचे मत मांडणार आहेत.

युएनजीएचे हे सत्र ९ सप्टेंबरपासून सुरु होऊन २३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ब्राझीलचे प्रतिनिधी प्रथम भाषण करतील, त्यानंतर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जागतिक नेत्यांना संबोधित करतील. चीन, पाकिस्तान, बांग्लादेश आणि इस्राईल यांचे राष्ट्राध्यक्ष २६ सप्टेंबरला महासभेला संबोधित करणार आहेत.

ही बैठक जागतिक पातळीवर मोठ्या चर्चेचा विषय ठरणार असून, शहबाज शरीफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संभाव्य चर्चा अनेकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/bengali-babyichya-katya-kadhanas-suruvat/