बार्शिटाकळी :- वंचित बहुजन आघाडीचे बार्शिटाकळी शहर प्रसिध्दी प्रमुख अमित तायडे यांनी येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून बार्शिटाकळी येथील विद्यार्थ्या करीता फ्री इंग्रजी क्लासेस चे आयोजन केले.बार्शिटाकळी शहरातील व तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्या करीता फ्री इंग्रजी क्लासेस चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलींद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी या फ्री इंग्रजी क्लासेस ला प्रमुख उपस्थिती महानगरपालिकेचे माजी गटनेते गजानन गवई, कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शिटाकळीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन, नगरपचायचे माजी गटनेते सुनिल सिरसाठ, शहराध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक श्रावण रामदास भातखडे,माजी तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, माजी रूग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान, अनिल धुरंधर, खंडारे, दादाराव जामनिक, सै.अन्सार, शुभम इंगळे, जमदाडे, नसरूल्ला भाऊ, उपस्थित होते.सदर कोचिंग क्लासेसचे संचालक जाधव , हे या विद्यार्थ्यांना शिकवणार असुन आज दुपारी तीन वाजेपर्यंत ११० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती अमित तायडे यांच्या उपक्रमाने त्यांच्यावर बार्शिटाकळी शहरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव जामनिक व सुनिल सिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रावण भातखडे यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/karanja-nagrit-suru-honar-nau-divas-religious-festival/
