अघोषित भारनियमनविरोधात आ. पठाण आक्रमक;

अघोषित भारनियमनविरोधात आ. पठाण आक्रमक;

उपशीर्षक:

तातडीने समस्या सोडवा अन्यथा वीज कार्यालयाची वीज बंद करू — आ. पठाण यांचा इशारा

अकोला | २१ मे २०२५ — अकोल्यात अघोषित भारनियमन दिवसेंदिवस बळावत चाललं असून, नागरिकांचे सामान्य

Related News

जीवन विस्कळीत झालं आहे. पाण्याचा तुटवडा, व्होल्टेजची अडचण, आणि

रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक ठिकाणी अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने

नागरिक संतप्त आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. हकीम पठाण यांनी महावितरणला तीव्र इशारा दिला आहे.

“महावितरणच्या कार्यालयाचीच वीज बंद करू!”

“तुम्ही नागरिकांना अंधारात ठेवत असाल, तर मग आम्ही तुमच्यावर प्रकाश टाकतो!”

असं म्हणत आ. पठाण यांनी महावितरण अधीक्षक अभियंता अजितपाल दिनोरे यांना तातडीने उपाययोजना करण्याचं निर्देश दिले.

“अन्यथा तीव्र आंदोलन होईल,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.

पश्चिम मतदारसंघात विशेष लक्ष?

आ. पठाण यांनी स्पष्टपणे सांगितलं की,

“पश्चिम अकोला मतदारसंघात भारनियमन अधिक होत असेल आणि तो भाजपच्या कोणत्या तरी

लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून होत असेल, तर त्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो, हे दाखवून देऊ.”

असा खडसावणारा इशाराही त्यांनी दिला.

“मेंटेनन्सच्या नावाखाली अंधार…”

तातडीनं मान्सूनपूर्व मेंटेनन्स सुरू असतानाही कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित केली जाते, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

“किमान नागरिकांना आधी कळवावं, एक तक्रार नोंदणीची यंत्रणा उभारावी,” अशी रास्त मागणी देखील आ. पठाण यांनी केली.

शेकडो नागरिकांचा पाठिंबा

महावितरण कार्यालयाबाहेर शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती. त्यात युसुफ खान, डॉ. वानखडे,

आकाश कवडे, सलीम अली, जिम्मी पठाण, मुजमील शेख (MS) यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.

Read Also :https://ajinkyabharat.com/goya-pakanam-jhudali-pan-explosion/

Related News