उंबर्डा बाजार कन्या शाळेला गळती; शिक्षण साहित्य भिजून विद्यार्थिनींचे मोठे नुकसान
उंबर्डा बाजार – येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला पुन्हा एकदा
गळती लागली असून शाळेतील शैक्षणिक साहित्य पावसाच्या पाण्यात
भिजल्याने विद्यार्थिनींसह शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून त्यापैकी नव्याने बांधकाम झालेल्या
दोनच वर्गखोल्यांत सतत पाणी गळत असल्याने शिक्षणाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना वर्गात बसणेही कठीण झाले आहे.
मुख्याध्यापक व दोन शिक्षक अशा मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे शिक्षकांनाही
गळतीच्या समस्येमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पावसामुळे ई-लर्निंगचे साहित्य, प्रोजेक्टर, एलसीडी,
पंखे यांसारखे महत्त्वाचे साहित्य ओले झाले असून लाखो रुपयांचे नुकसान
झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या समस्येबाबत
कारंजा लाड गटशिक्षणाधिकाऱ्यांना अवगत करूनही योग्य दखल घेतली गेली नाही,
अशी पालक मंडळींची नाराजी आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीचे छत
अधिकच कमजोर होण्याची शक्यता असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
शिक्षण विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/illegal-liquor-seller-dhad-3070-rupees/