बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर
लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
गेल्या 8 तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक
ठप्प आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी
बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं.
पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलकांचा आक्रोश
पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत
काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं.
“बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे.
तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये.
कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे.
पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये
खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत”,
अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. “पीआयला निलंबित केलं.
मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही.
स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे.
लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही.
जे शक्यच नाही अशी मागणी मान्य करता येत नाही. घटना संतापजनक आहे.
आमच्या मनातही तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा कायद्याने द्यावी लागेल.
कसाबने एवढी माणसे मारली. पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली”,
असेही गिरीश महाजन म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/vinesh-phogat-utarnar-rajyastakhya-akhadyat/