उईके कुटुंबीयाकडून मुख्यमंत्र्यांच आदरातिथ्य 

उईके

मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.   यवतमाळ. संत मोरारी बापू यांच्या रामकथेसाठी यवतमाळ दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आपला व्यस्त कार्यक्रम बाजूला सारून राज्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या निवासस्थानी शनिवारी दि. १३ सदिच्छा भेट दिली. यावेळी उईके कुटुंबीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे मंत्री उईके यांच्या निवासस्थानी उत्साहाचे वातावरण होते. यावेळी कोणताही राजकीय बडेजाव न ठेवता, मुख्यमंत्र्यांनी अत्यंत घरगुती वातावरणात उईके कुटुंबीयांसोबत संवाद साधला. उईके कुटुंबीयांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी “एक्स” पोस्ट शेअर करत त्यांचे विशेष आभार मानले. एका मुख्यमंत्र्याने आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याच्या घरी जाऊन भेट देण्याच्या या कृतीमुळे, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/anti-corruption-struggle-secretly-aircraft-kidnapping-blind/

Related News