उद्या शहरातून निघणार सैनिकांची मोटारसायकल रॅली; शहिदांच्या परिवाराचा होणार सत्कार

कारगिल

अकोला: कारगिल विजय दिवस रजत महोत्सव निमित्ताने आयोजन

देशभक्त आजी-माजी सैनिक, सेवाभावी संस्था अकोला

व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने

Related News

उद्या, २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे

शहिदांना श्रद्धांजली आणि मानवंदना देऊन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फअर सोसायटीचे अध्यक्ष

डॉ. सुगत वाघमारे व देशभक्त आजी-माजी सैनिक

सेवाभावी संस्थाध्यक्ष मेजर मनोहर चव्हाण, देवळी येथील सरपंच कोमल दीपक पातोंड

यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून मोटारसायकल रॅली प्रारंभ होऊन इन्कम टॅक्स मार्गे सहकार नगर,

शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राजयोग मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

त्यानंतर जिल्ह्यातील सर्व वीर शहीद जवानांचा परिवार,

ज्यामध्ये वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, वीर पुत्र, अश्या परिवाराचा सत्कार करण्यात येणार आहे,

त्यानंतर देशभक्ती गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अशी माहिती देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष

मेजर मनोहर गोकुळ चव्हाण यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली.

देशात गेल्या २५ वर्षेपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले.

त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.

त्या विजयाचा रजत महोत्सव असून जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक,

त्यांचे नातेवाईक, देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,

असे आवाहन तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार,

देशभक्त आजी -माजी सैनिक सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोहर चव्हाण,

सचिव श्रीकृष्ण आखरे, उपाध्यक्ष सुभेदार मेजर अर्जुन बुधनेर,

कोषाध्यक्ष मेजर किशन राठोड, दीपक पातोंड आदींनी केले आहे.

शहिदांची आठवण फक्त सैनिकांनाच का? नागरिकांना का नाही?

देशप्रेम व्यक्त फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि दुर्दैवाने जवान शहीद झाल्यानंतरच आठवले जाते.

देशात गेल्या २५ वर्षांपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले,

त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.

त्या विजयाचा रजत महोत्सव २६ जुलैला असून,

हा महोत्सव केवळ सैनिकांना करावा लागतो, ही शोकांतिका आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Read also: https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivrai-is-needed-for-modis-power-but-there-is-no-memorial-manoj-jarange/

Related News