धाकली, भेंडीमहाल, येथील रस्ता बांधकामात मोठी अनिमितता
बार्शीटाकळी : तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेले खेरडा (भागाई) भेंडीमहाल टिटवा धाकली अशा या रस्त्याचे बांधकाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत सुरू आहे, या महत्त्वपूर्ण कामावर संबंधित कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार हे अजिबात हजर दिसत नाहीत, बेताल पणे रस्त्याचे बांधकाम सुरू आहे, या बांधकामांमध्ये फार मोठी अनियमितता असल्याचा आरोप गावाशेजारील लोकांनी केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २५ सप्टेंबरला भेंडीहाल घाटटेक येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येणार म्हणून संबंधित रस्त्याचे अत्यंत थातूरमातूर आणि बोगस काम करीत आहेत, रस्त्यावर काँग्रेटीकरण सुरू आहे,
या बांधकामाचे कंत्राटदार वायडी शर्मा असल्याचे सांगण्यात येत आहे, या रस्ता बांधकामाचा दर्जा अत्यंत हिन असून काँक्रिटीकरण करताना पूर्वीचा रस्ता खोदल्या गेला नाही, सरळ डांबरीकरण वरच काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, , केवळ मुख्यमंत्री उद्या परवा या मार्गावर येत असल्याने कंत्राटदार आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी अतिशय गडबड करीत आहे, या गडबडीमध्ये अत्यंत बोगस काम होत आहे, मुख्यमंत्री गेल्यानंतर हा रस्ता काही दिवसातच उघडणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे, त्यामुळे संबंधित अधिकारी कार्यकारी अभियंता यांनी या कामाचा दर्जा सुधारावा, आणि या महत्वपूर्ण रस्त्याचे बांधकाम दर्जेदार करावे अन्यथा, या भागातील नागरिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणाऱ्याची माहिती सुद्धा ग्रामस्थांनी दिली आहे,या रस्त्याचे बांधकाम शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणेच सुरू आहे, यात कोणतीही अनियमितता नाही, आणि काँक्रिटीकरण करीत असताना रस्ता अजिबात खोदल्या गेला नाही, अशी लोकांची तक्रार आहे, असे त्यांना म्हटल्यानंतर त्यांनी आपल्या कंत्राट दाराची सुद्धा प्रशंशा केली, वाय डी शर्मा हे नेहमी काम चांगले करतात, असे ते म्हणाले, परंतु ग्रामस्थांचा आरोप उलटा आरोप असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणाले की, आम्ही रस्ता बांधकामात सुधारणा करू, मी उद्याला कामावर येत आहे, मुख्यमंत्री येणार म्हणून काम काही गडबडीने नाही, असे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची शाखा अभियंता प्रशांत ढवळे म्हणाले,
read also : https://ajinkyabharat.com/shetkari-sankatachi-serious-axis/#google_vignette
