उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे – देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत

झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे

Related News

विधान केलं आहे. आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत.

निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार

आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू

नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी

आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर

आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात

महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं

आहे. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या

रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं

त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती

आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असंही

आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Read also: https://ajinkyabharat.com/malaika-aroracha-shines-in-yek-number/

Related News