2026 “महापालिका हिंदू-मुस्लिम भांडणासाठी नाही” Uddhav ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Uddhav

Uddhav Thackeray : ‘महापालिका हिंदू-मुस्लिम भांडणासाठी नाही’  उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल

मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (Uddhav  बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख Uddhav  ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. “महापालिका निवडणुका या शहराच्या विकासासाठी असतात, हिंदू-मुस्लिम भांडण लावण्यासाठी नाहीत,” असे ठणकावून सांगत Uddhav ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर अनेक परखड प्रश्न उपस्थित केले.

एका जाहीर सभेत बोलताना Uddhav ठाकरे म्हणाले की, “जर महापालिकेच्या निवडणुका हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरच लढवायच्या असतील, तर मग शाळेतील मॉनिटरच्या निवडणुकीतही हिंदू-मुस्लिम केलं असतं. पण महापालिका ही शहर चालवण्यासाठी असते, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते.”

‘आम्ही असताना मुंबईला तोडण्याची हिंमत नव्हती’

Uddhav ठाकरे यांनी 2013 ते 2022 या काळातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. “2013 मध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीत होती. पण आम्ही 2022 पर्यंत ती 92 हजार कोटी रुपयांपर्यंत प्लसमध्ये नेली. तेव्हा यांची हिंमत होत नव्हती. आम्ही सोबत असताना मुंबईला तोडण्याचा प्रयत्नही झाला नव्हता,” असे ते म्हणाले.

Related News

ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईकरांवर बिल्डरांची दादागिरी वाढली आहे. “वेज-नॉनव्हेजच्या नावाखाली लोकांच्या जीवनशैलीत हस्तक्षेप केला जात आहे. हे बिल्डर कोण आहेत? त्यांना कोण पाठीशी घालत आहे? त्यांना हाकलून द्या,” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हिंदी सक्तीवर संताप, ‘का करता सक्ती?’

भाषेच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे आक्रमक झाले. “आम्ही म्हणतो मराठी होणार. ते म्हणतात हिंदी-मराठी होणार. हिंदीची सक्ती का करता? कोण ओळखतं तुम्हाला? मराठी माणसाच्या अस्मितेला का धक्का देता?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? बाळासाहेब ठाकरे एक वाक्य सांगायचे — हिंदुस्थानात हिंदू, महाराष्ट्रात मराठी. गुजरातमध्ये गुजराती. पण हे मराठी माणसाला हिंदूच मानायला तयार नाहीत. आम्ही अस्सल हिंदू आहोत, हिंदू मराठी आहोत.”

आरोग्य, प्रदूषण आणि ‘विनाशाची नीती’

Uddhav  ठाकरे यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “आज लहान मुलांच्या फुफ्फुसांचे आजार वाढले आहेत. धूम्रपान करा किंवा करू नका, आजार होतोय. ही विकासाची दिशा आहे की विनाशाची?” असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “२२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी तोडण्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही विकासाची नीती आहे की विनाशाची? ‘स’ आणि ‘श’ मधला फरक आहे. यांची विनाशाची नीती आहे. हॉस्पिटल लागू नये असं आयुष्य हवं, हेच आमचं ध्येय आहे.”

‘कोस्टल रोड, शाळा, हॉस्पिटल हे विकास नाही का?’

सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना Uddhav ठाकरे म्हणाले, “कोस्टल रोड हा विकास नाही का? शाळांची सुधारणा हा विकास नाही का? झोपडपट्टी धारकांना चांगली घरं देणं हा विकास नाही का? वैद्यकीय महाविद्यालयं, हॉस्पिटल उभारणं हा विकास नाही का? आम्ही कितीतरी विकासाची कामं केली. महापालिका यासाठीच असते.”

ते पुढे म्हणाले की, “एकही निवडणूक अशी नाही जिथे यांनी हिंदू-मुस्लिम केलं नाही. प्रत्येक वेळी समाजात फूट पाडण्याचं काम केलं जात आहे.”

‘का यांना कचरा गोळा करावा लागतो?’

Uddhav ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत सत्ताधाऱ्यांवर टीका करत अनेक प्रकरणांचा उल्लेख केला. “विकृत नगरसेवकांवर बोलावं. साधू हत्याकांडातील आरोपी घेतले, त्यावर बोलावं. प्रफुल्ल पटेलवर बोलावं. त्या कुत्र्यावर बोलावं. देवयानी बाईंना अश्रू आवरले नाहीत. त्यांनी आधी आपला पक्ष बघावा. का यांना कचरा गोळा करावा लागतो?” असा थेट सवाल त्यांनी केला.

महापालिका निवडणुकीत विकास विरुद्ध द्वेषाचा सामना

Uddhav ठाकरे यांच्या या भाषणामुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय चर्चेला नवी धार मिळाली आहे. एकीकडे विकास, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यासारख्या मुद्द्यांवर भर देणारी भूमिका, तर दुसरीकडे धर्म, भाषा आणि ओळखीच्या राजकारणावर आधारित प्रचार — असा स्पष्ट संघर्ष आगामी निवडणुकांत पाहायला मिळणार आहे.

“महापालिका शहर चालवण्यासाठी असते, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नाही,” हा उद्धव ठाकरे यांचा संदेश सध्याच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मूळ उद्देश नागरिकांना मूलभूत सुविधा देणे, विकासकामे करणे आणि शहराचा कारभार सुरळीतपणे चालवणे हा आहे. मात्र, अलिकडच्या काळात महापालिका निवडणुकांमध्ये विकासापेक्षा धार्मिक, जातीय आणि भाषिक मुद्द्यांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दिलेला हा संदेश मतदारांच्या मनात कितपत रुजतो, यावरच आगामी राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

विशेषतः शहरी मतदार वर्ग शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, पर्यावरण आणि घरांच्या प्रश्नांबाबत अधिक जागरूक होत आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राजकारणाऐवजी विकासकेंद्री, सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण धोरणांना मतदार किती महत्त्व देतात, हे येत्या निवडणुकांत स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांचा हा विचार जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला, तर स्थानिक राजकारणाची दिशा बदलू शकते, असेही जाणकारांचे मत आहे. परिणामी, महापालिका निवडणुकांमध्ये मुद्देसूद राजकारणाला चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

read also:https://ajinkyabharat.com/uddhav-thackeray-we-have-come-together/

Related News