उद्धव ठाकरे मागच्या रांगेत का ?

उद्धव ठाकरे मागच्या रांगेत का ?

शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यात ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते.

याआधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांना जेवणाचे आमंत्रण होते.

त्यानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब तिथे पोहोचले.

मात्र, बैठकीत त्यांना 7व्या रांगेत बसवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे.

या बैठकीला उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरेही होते.

राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगावरील प्रेझेंटेशन दिले.

यावेळी समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये ठाकरे, राऊत आणि आदित्य शेवटच्या रांगेत बसलेले दिसत होते.

 यावरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाने उद्धव ठाकरेंना टोले मारले.

 केशव उपाध्ये यांनी “हिंदुत्व, विचारधारा सोडली की शेवटची रांग मिळते” असा टोला मारला, तर नरेश म्हस्के यांनीही खिल्ली उडवली.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “हा इनफॉर्मल गेटटुगेदर होता, प्रोटोकॉल कार्यक्रम नव्हता.

पवार साहेब देखील मागे बसले होते, अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत होते.

कुटुंबासोबत जेवणासाठी निमंत्रण होते, त्यामुळे ज्याला जिथे जागा मिळाली तिथे तो बसला.

सिनेमा बघताना आपण पुढे बसतो का मागे, असा प्रश्न मी विचारते.” त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना हास्यास्पद म्हटलं.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या जावयासंदर्भातील प्रश्नावर सुळे म्हणाल्या, “रोहिणीताईंच्या नवऱ्याचा पक्षाशी काही संबंध नाही.

आम्ही कोणाच्या कुटुंबात हस्तक्षेप करत नाही, आणि कोर्टाचा आदेश पाळला पाहिजे.”

Read Also :https://ajinkyabharat.com/miscellaneous-kamanasathi-karchayankadun-pashachi-magani/