हिंदू धर्माला कलंक लावणारा हा इसम आहे. मी सकाळी पत्रकार परिषदेत
व्हिडिओ दाखवला तेव्हा देखील मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. आत्ताही मी कोणाचं नाव घेत नाही.
मात्र हा व्हिडिओ दाखवल्यानंतर हा इसम कोण आहे हे पोलिसांनी शोधावं असं मी म्हंटलं होतं.
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
हे व्हिडिओ हिंदू देवतांची विटंबना करणारे आहेत. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी.
या घटनेला जातीचा रंग द्यायची गरज नाही. त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे,
अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्यातील कैलास बोराडे या व्यक्तीला चटके
दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. कैलास बोराडे या व्यक्तीचा
देव-देवतांसोबतचा एक व्हिडिओ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांना दाखवला आहे.
त्यानंतर स्वत: कैलास बोराडे याने यावर बोलताना आपल्या अंगात देव येतो म्हणून आपण असं वागतो आणि
आपण पिलेली दारू ही प्रसाद होती, असा खुलासा त्याने केला आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना या खुलाशावर संताप व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. यामुळे काहींच्या हातात आयतं कोलीत जातं.
जसं छगन भुजबळ यांच्या हातात गेलं आहे. जातीय विष पेरून ते भाजप आणि फडणवीस यांच्या सरकारला,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डाग लावत आहेत. मागचा पुढचा विचार न करता कोणाचेही फोटो कोणालाही चिटकवून दाखवतात.
एवढा उतावळेपणा नको. भाजपचा नारा आहे, एक है तो सेफ है, मग अशा प्रकारच्या हिंदू देवतांच्या
विटंबनेवर फडणवीस सरकार काय भूमिका घेणार? असा संतप्त प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/shegav-ram-mandir-started-traditional-utsavacha/