’त्या’ नराधम शिक्षकाला फाशी देण्याची मागणी

अत्याचारानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकी पेशाला काळिमा

ढाणकी शहरात कडकडीत बंद; अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराच्या घटनेने जनमन क्षुब्ध

ढाणकी (ता.उमरखेड, यवतमाळ) : शहरातील एका खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यानंतर प्रकृती बिघडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल, सोमवारी (दि. 22) रोजी उघडकीस आली. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले असून, आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर याला बिटरगाव पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज, मंगळवारी (दि.23) शहरातील व्यापार्‍यांनी आणि नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. सकाळपासूनच सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती.
मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास शहरातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिक एकत्र जमले. सर्वप्रथम, पीडित विद्यार्थिनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा आणि आरोपी शिक्षकाला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे. ‘शिक्षकी पेशा हा पवित्र मानला जातो, मात्र या घटनेने त्याला काळिमा फासला आहे,‘ अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, ‘अशा घटना पुन्हा घडूच नयेत यासाठी पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे,‘ असे मतही अनेकांनी मांडले. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. संतप्त जमावाने गुंडेकर कोचिंग क्लासेसच्या बॅनरची तोडफोड करून निषेध व्यक्त केला. श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना आरोपीला फाशी झाली पाहिजे, पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी, गुंडेकर इन्स्टिट्यूट चालवणार्‍या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा उमरखेड तालुका येथे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याचा इशारा दिला. अ‍ॅड. निरंजन दवणे यांनी पीडितेच्या कुटुंबाला सर्व प्रकारची कायदेविषयक मदत मोफत देण्याची घोषणा केली. यावेळी आमदार किसनराव वानखेडे, भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, बाळू पाटील चंद्रे, ख्वाजा भाई, आनंदराव चंद्रे, दत्तदिगंबर वानखेडे, सादिक शेख, प्रशांत विनकरे, रोहित वर्मा, संबोधी गायकवाड, अमोल तुपेकर, प्रवीण पाटील मिराशे, सय्यद माजीद, सूर्यकांता वासमवार, शिवाजी फाळके, महेश पिंपरवार, अनिल येरावार, बंडू जिल्हावार, जहीर जमीनदार, आनंद पोपुलवार, रमेश गायकवाड, किशोर ठाकूर, रामराव गायकवाड, शंकर जाधव, संभाजी गोरठकर, रमेश गायकवाड, नागेश दिलेवार, हामीद भाई, राहुल नरवाडे, इमाम भाई, बालाजी येलूरवार, वामनराव मुनेश्‍वर, रूपेश भांडारी, अहेमद कुरेशी, इब्राहिम, सय्यद खालिद, माधव आलकटवार, बालाजी आलकटवर, बंटी जाधव यांची उपस्थिती होती. उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना आपल्या माग्याचे निवेदन देण्यात आले. ढाणकी बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ठाणेदार पांडुरंग शिंदे, मोहन चाटे, रवी गीते, प्रकाश मुंडे, रोशन सरनाईक, शरद चव्हाण, दत्ता कवडेकर, अंबादास गारोळे यासह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते.

दामिनी पथकाची अत्यंत गरज
शहरात परिसरातील सर्वांत मोठी मुलींची शाळा असून बारावीपर्यंत त्या शाळेत शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे खेड्यापाड्यातील मुली शिक्षणासाठी शहरात येतात. अशावेळी चिडीमारी करणारे मुले शाळा व परिसरामध्ये फिरत असल्याने मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधी सुद्धा शहरातील नागरिकांनी दामिनी पथकाची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या बाबीला गांभीर्याने घेतले नाही.

Related News

READ ALSO : https://ajinkyabharat.com/damagatcha-dhoka-vadhala/

Related News