Govinda Divorce Update : घटस्फोटाच्या अफवांवर विराम, गोविंदाचे वकील म्हणाले – “सगळं मिटत आहे”
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून गोविंदा सुनिताला घटस्फोट देणार आणि एका मराठमोळ्या
अभिनेत्रीला डेट करत आहे अशा बातम्या सोशल मीडियावर वेगाने पसरत होत्या.

गोविंदा सुनिता
मात्र, आता स्वतः गोविंदाच्या वकिलांनी याबाबत खुलासा केला आहे.
वकिलांचं स्पष्टीकरण
गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना स्पष्ट केलं की,“कोणताही खटला नाही, सगळं मिटत आहे. लोक जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत.”
तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या गणेशोत्सवात गोविंदा आणि सुनीता कुटुंबासह एकत्र दिसणार आहेत.
काल आलेला धक्कादायक दावा
काल हाउटरफ्लायच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की
सुनीता आहुजाने वांद्रे कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे.
त्यात व्यभिचार, क्रूरता आणि परित्याग यांचा उल्लेख केला होता.
माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती.
सुनावण्यांना सुनीता नियमित हजर राहत असताना, गोविंदा मात्र कोर्टाच्या समुपदेशन सत्रांना अनुपस्थित राहिल्याचे अहवालात म्हटले गेले होते.
यापूर्वीही अफवा
हे पहिल्यांदाच नाही की या जोडप्याच्या नात्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.
फेब्रुवारी 2025 मध्येही वेगळं होण्याचे वृत्त पसरले होते. त्यावेळी गोविंदाची एका मराठी अभिनेत्रीशी वाढती जवळीक
हा मतभेदाचा प्रमुख मुद्दा असल्याचं म्हटलं गेलं होतं.
कौटुंबिक मित्रांचा दावा
गोविंदाचे कौटुंबिक मित्र ललित बिंदल यांनी सांगितलं की,
“गोविंदा आणि सुनीता मजबूत नात्यात आहेत आणि ते नेहमी एकत्र राहतील.”
Read also : https://ajinkyabharat.com/garbage-kundit-6-years-old-mulicha-dead/