त्या दिवशी तिला समोर बघणं खूप कठीण होतं…

‘अजूनही मेसेज करावासा वाटतो’

मुंबई :मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व स्तब्ध झाले आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत तिने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनानंतर सहकलाकार आणि जवळचे मित्र आजही भावनिक होत आहेत.

अभिनेता अभिजीत खांडकेकर याने प्रियासोबतच्या आठवणी सांगताना डोळ्यांतले अश्रू दाबले नाहीत. तो म्हणाला,
“शेवटच्या दिवसांत प्रियाला दोन शब्द बोलणं देखील कठीण झालं होतं. मी तिच्याजवळ कायम होतो. शंतनूनंतर फक्त मला तिच्या आजाराबद्दल माहिती होती. आम्ही इतके जवळचे होतो की, ती इतक्या लवकर आपल्यात नसेल यावर अजूनही विश्वास बसत नाही.”

अभिजीत पुढे म्हणाला,
“आजही मी फोनमध्ये तिचं नाव टाईप करतो… कारण निधनाच्या आदल्यादिवशीच तिला मेसेज केला होता. काही दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. तिला कोणालाही भेटायचं नव्हतं, पण एक मित्र म्हणून मी हट्ट करत होतो की, काहीही बोलू नकोस, फक्त मला एकदा येऊन भेटू दे… पण जे देवाच्या मनात असतं तेच होतं.”

त्याने तिच्या शेवटच्या दर्शनाचा उल्लेख करत सांगितलं –
“प्रियाला आम्ही नेहमी नटलेल्या, सजलेल्या रुपात पाहिलं होतं. पण त्या दिवशी तिला समोर बघणं खूप कठीण होतं. मात्र तिच्या सुंदर आठवणी कायम मनात राहतील.”

प्रिया मराठेचे अखेरचे दिवस

कर्करोगाचे निदान झाल्यानंतर प्रियाने मालिकांपासून आणि सोशल मीडियापासून अंतर घेतले होते.

शेवटच्या दिवसांत तिची तब्येत जलद गतीने खालावत गेली.

तिला भेटण्याची इच्छा अनेक सहकलाकारांनी व्यक्त केली होती, पण ती कुणालाही भेटण्यास तयार नव्हती.

चाहत्यांचा मोठा धक्का

प्रियाच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांनाही या बातमीने मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर आजही तिच्या आठवणी, फोटो आणि कामगिरीबद्दल पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

 मराठी सिनेविश्वात आजही एकच हळहळ व्यक्त केली जाते – “प्रियासारखी हसतमुख, प्रतिभावान अभिनेत्री इतक्या लवकर आपल्यात नसेल, हे कोणालाच पचवता येत नाही…”

read also :https://ajinkyabharat.com/solar-krishi-vahini-projects-karanyachi-magani-acute/