उद्घाटनानंतर दोन महिन्यातच ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला गेल्या तडा

MMRDA

MMRDA ने कंत्राटदाराला ठोठावला 1 कोटीचा दंड

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू- ‘अटल सेतू’च्या अप्रोच रोडला

उद्घाटनानंतर दोन महिन्यातच तडे गेल्याची बाब समोर आली होती.

Related News

या घटनेनंतर मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने स्ट्रबाग

या कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबईतील उलवे ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाचे

उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

माहितीचा अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते अनिल गंगाली यांनी सांगितले की,

‘एमएमआरडीएने सांगितले की, जून 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात

अटल सेतूच्या ऍप्रोच रोडवर खड्डे पडल्याच्या बाबतीत, तपासणीदरम्यान

पुलाच्या रॅम्प 5 ला जोडणाऱ्या तात्पुरत्या रस्त्यावर काही लहान खड्डे आढळून आले.

तो मुख्य पुलाचा भाग नव्हता. त्यानंतर हे खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात आले.

या संदर्भात स्ट्रॅबग या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.’

गंगाली यांना मिळालेल्या कागदपत्रांनुसार, 22 जून 2024 रोजी एमएमआरडीएचे

मुख्य अभियंता डीएम चामलवार यांनी स्ट्राबाग या कंत्राटदाराला नोटीस बजावली.

सदर रस्त्याचे काम 5 जानेवारी 2024 रोजी पूर्ण झाले मात्र,

कामाचा दर्जा राखला गेला नाही. यानंतर, अटल सेतूचे सल्लागार केआर शिवानंद

यांनी स्ट्रॅबग या कंत्राटदाराला 1 कोटी रुपयांची नोटीस पाठवली.

ही नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत वरील समस्या दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.

Read also: https://ajinkyabharat.com/state-governments-jeevan-gaurav-award-to-actor-shivaji-satam-and-actress-asha-parekh/

Related News