‘तुंबाड’ पुन्हा होणार रिलीज!

बॉलिवूडमध्ये

बॉलिवूडमध्ये गाजलेला सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे.

हा सिनेमा म्हणजे ‘तुंबाड’. राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘ तुंबाड’

सिनेमा पुन्हा रिलीज होणार असल्याने सर्वांना आनंद झाला आहे.

Related News

२०१८ मध्ये रिलीज झालेला ‘तुंबाड’ सिनेमा ३० ऑगस्टपासून

पुन्हा एकदा नजीकच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

येत्या शुक्रवारी हा सिनेमा भारतातील काही थिएटरमध्ये पुन्हा रिलीज

करण्यात येणार आहे. सोहम शाह निर्मित आणि राही अनिल बर्वे

दिग्दर्शित ‘तुंबाड’ पाहून थिएटरमध्ये अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.

हाच अनुभव पुन्हा घेण्यासाठी प्रेक्षक ३० ऑगस्टला थिएटरमध्ये

गर्दी करतील यात शंका नाही. राही अनिल बर्वेच्या ‘तुंबाड’ मुळे

‘स्त्री २’ च्या कमाईवर परिणाम होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘तुंबाड’ हा सिनेमा थिएटरमध्ये अनुभवण्यासारखा सिनेमा आहे.

या सिनेमाला आजही एक मास्टरपीस म्हणून ओळखलं जातं.

याशिवाय ३० ऑगस्टला कोणताही नवीन बॉलिवूड सिनेमा रिलीज होत नसल्याने

‘तुंबाड’ पाहायला दर्दी प्रेक्षक थिएटरमध्ये जातील यात शंका नाही.

यामुळे सध्या कमाईचा पाऊस पाडणाऱ्या ‘स्त्री २’ च्या कमाईवर थोडाफार

परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/aghadi-of-haryana-assembly-dushyant-chautala-and-chandrashekhar-azad/

Related News