बातमी:जगभरात चांगलेच चर्चेत असलेले भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा गँगवाराच्या जोरावर चर्चेत आला आहे. पोर्तुगालमध्ये लॉरेंन्स गँगशी संबंधित रणदीप मालिकने सोशल मीडियावर एका फायरिंगच्या जबाबदारीची कबुली दिल्यानंतर आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने फेसबुक पोस्ट आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोईला थेट धमकी दिली आहे.
शहजाद भट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत दावा केला की, लॉरेन्स बिश्नोईने त्याचे गुंड पाठवून त्याच्या घराबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या व्हिडिओत शहजाद भट्टी म्हणतोय, “तू बाकी लोकांसाठी गँगस्टर असशील, माझ्यासमोर काही नाही. गँगस्टर बनून लोकांना मारण्याची हौस असेल, तर ये. नाहीतर ज्या दिवशी जेलमधून बाहेर येशील, त्यावेळी तुला समजेल कोण किती मोठा गुंड आहे.”
या व्हिडिओ कॉलमध्ये शहजादने चॅलेंज करत लॉरेन्स बिश्नोईच्या लोकेशनवर पोहोचल्याचं दाखवलं. तसेच शहजादने आपल्या धमकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं, “मी काही सिद्धू मुसेवाला नाही. त्याचे वडील म्हातारे आहेत. परंतु तू माझ्या मार्गात आल्यास तुझे तुकडे-तुकडे होणार आहेत.”
शहजादने या व्हिडिओतून 5 कोटी रुपयांची मागणी देखील केली आहे. त्याने पोर्तुगालच्या प्रकरणाची आठवण करून दिली आणि भारतात पुन्हा गँगवार सुरु झाल्याचं म्हटलं.
शहजाद भट्टी पाकिस्तानमधील एका मोठ्या माफिया नेटवर्कशी संबंधीत असून त्याच्यावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. मात्र त्याने टीव्ही 9 शी बोलताना स्पष्ट केलं की, “माझ्यावर बंदी नाही. मी स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दुसऱ्या देशात आसरा घेतला आहे.”
ही धमकी समाजात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. भारतात पुन्हा एकदा गँगवार सुरु झाल्याचा गंभीर इशारा समोर आला आहे. या प्रकरणी पुढील तपास अद्याप सुरू असून, संबंधित पोलिस आणि एजन्सीने लक्ष घालून तपास सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/national-sports-wisdom/