अजिंक्य भारत/प्रतिनिधी
अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव घुबे बिट अंतर्गत येणाऱ्या ग्राम भरोसा येथील पती आणि पत्नीने आपल्या
स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडांला साडीच्या साहाय्याने दि.२४ जुलै २०२५ रोजी दुपारी दुपारी दोन ते तीन
वाजेदरम्यान गळफास घेऊन आपले जिवन संपविले. याबाबत सविस्तर वृत्त असे की
मृतक गणेश श्रीराम थुट्टे वय ५० वर्षे, व पत्नी रंजना गणेश थुटटे वय ४८वर्षे,दोन्ही रा.भरोसा हे शेतीचा कामधंदा करत असत
व आपला उदरनिर्वाह चालवत असत. त्यांच्याकडे भरोसा शेत शिवार भाग २ मध्ये गट नं. ३१७ मध्ये ५ एकर जमीन आहे.
यावर्षी अल्प पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकांवर हुमनी अळीने थैमान घातले असून हातातील पिक यावर्षी पण वाया जाते की काय या भितीने कर्जाचा
वाढता डोंगर या चिंतेने दोघा पती-पत्नीने नैराश्य पोटी गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
घटनेची माहिती भरोसा येथील उध्दव थुट्टे यांनी ठाणेदार रुपेश शक्करगे यांना देताच ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी
आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.आणि दोन्ही मृतांना शिवविच्छेदनासाठी ग़्रामीण रुग्णालय चिखली येथे पाठवले.
चुलतभाऊ एकनाथ प्रभाकर थुट्टे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी मार्ग दाखल करण्यात आला
असून पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिध्दार्थ (दा) सोनकांबळे करीत आहेत.या घटनेने भरोसा गावावर शोककळा पसरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/rural-rugnalaya-barshitaki-yehe-facil/