‘तृप्ती बार अँड रेस्टॉरंट’ला भीषण आग; लाखोंचे नुकसान

तृप्ती बार अँड रेस्टॉरंट’ला भीषण आग

पांढरकवडा : ‘तृप्ती बार अँड रेस्टॉरंट’ला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही

यवतमाळ – पांढरकवडा शहरातील वाय पॉईंट भागातील ‘तृप्ती बार अँड रेस्टॉरंट’ला स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अचानक भीषण आग लागली.

काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करून लाकडी फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक केले.

अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र रेस्टॉरंट मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही असून, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/yawatmaat-ranbhaji-mahotswa/