ट्रम्प यांच्या टॅरिफवर रघुराम राजन यांची पहिली प्रतिक्रिया; सरकारला दिला महत्त्वाचा सल्ला

“रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा फेरविचार करा – राजन”

नवी दिल्ली :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर

50 टक्के टॅरिफ लावल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या निर्णयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राजन यांनी म्हटलं आहे की, “ट्रम्प यांचा 50 टक्के टॅरिफचा निर्णय

हा भारत-अमेरिका संबंधांसाठी मोठा धक्का आहे.

हा सरकारसाठी वेक अप कॉल आहे.

एका देशावर अवलंबून राहण्याऐवजी भारताने युरोप, आफ्रिका आणि

पूर्वेकडील देशांसोबत व्यापार वृद्धीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.”

अमेरिकेच्या निर्णयामुळे वस्त्र, रत्न, दागिने, क्रीडा साहित्य, फर्निचर, केमिकल्स

अशा मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या उद्योगांना थेट फटका बसणार आहे.

छोटे शेतकरी, कपडा उत्पादक व लघुउद्योजकांचे रोजगार धोक्यात

आल्याचेही राजन यांनी निदर्शनास आणले.

राजन यांनी सरकारला रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणाचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.

त्यांच्या मते, “यातून शुद्धीकरण करणाऱ्यांना नफा होत असला

तरी निर्यातदार त्याची किंमत चुकवत आहेत.

त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.”

तसेच, भारताने 8 ते 8.5 टक्के विकासदर गाठण्यासाठी धोरणात्मक सुधारणा

केल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.

read also:https://ajinkyabharat.com/ganpati-bappa-morya-jayagoshat-ganarayache-akotamadhyay-arrives/