ट्रम्प यांचा ५० % टॅरिफ प्लॅन फेल होण्याच्या मार्गावर

भारत ५०  देशांसोबत व्यापार वाढवणार

ट्रम्प यांचा ५० % टॅरिफ प्लॅन फेल होण्याच्या मार्गावर; भारत ५०  देशांसोबत व्यापार वाढवणार

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० % टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

हा कर दोन टप्यात लागू होत असून, २५ % टॅरिफ आधीच लागू झाले आहे, तर उर्वरित २५ % टॅरिफ २८ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

हा भारतावर लावलेला आतापर्यंतचा सर्वाधिक करांपैकी एक मानला जातो.

भारताची प्रतिकारयोजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले असून, भारताने अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करून ५०  देशांशी व्यापार वाढवण्याची योजना आखली आहे.

यामुळे अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे.

आफ्रिका आणि मध्य पूर्व केंद्रबिंदू

सरकार आता अमेरिकेऐवजी पश्चिम आशिया, आखाती देश आणि आफ्रिकेतील ५०  देशांकडे निर्यात वाढवण्याच्या तयारीत आहे.

सध्या या देशांमध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ९० % निर्यात होते, ती आणखी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. वाणिज्य मंत्रालय या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

युरोप आणि ब्रिटनसोबत करार

अलीकडेच भारताने ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केला असून, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार १२० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

युरोपियन युनियनसोबतचा करारही अंतिम टप्प्यात असून, आइसलँड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंडसह इतर देशांसोबत करार ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.

या पावलांमुळे अमेरिकेचा भारतावर ५० % कर लावण्याचा निर्णय प्रभावी ठरण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/nayagavamadhyaye-alpaviyin-bangladeshi-mulichi-sutka-donashe-vaan-aancharacha-thararak-ulagada/