ट्रम्प वारले…? सोशल मीडियावर #TrumpIsDead ट्रेंड; अफवांमुळे खळबळ, व्हाईट हाऊसचा खुलासा

डोनाल्ड ट्रम्प वारले? X वर #TrumpIsDead ने केला धुमाकूळ!

ट्रम्प वारले…? सोशल मीडियावर #TrumpIsDead ट्रेंड; अफवांमुळे खळबळ, व्हाईट हाऊसचा खुलासा

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूबाबत सोशल

मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून ‘Trump is Dead’ हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत आहे.

X (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत तब्बल १ लाख ४४ हजारांहून

अधिक लोकांनी “ट्रम्प वारले” अशा प्रकारच्या पोस्ट केल्या आहेत.

त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्याविषयी सतत वादग्रस्त घडामोडी घडत आहेत.

जागतिक स्तरावर विविध देशांवर कर लादणे, त्यांचे वादग्रस्त भाषण,

तसेच त्यांच्या वयामुळे आरोग्याच्या चर्चांना नेहमीच वाव मिळत असतो.

जुलै महिन्यात त्यांच्या हाताला दुखापत व घोट्यात सूज आल्याचे वृत्त समोर आले होते.

त्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते.

उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांच्या वक्तव्याने पेटली चर्चा

२७ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष

जेडी व्हान्स यांनी एका मुलाखतीत “भविष्यात काही भयानक घडले,

तर मी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे,” असे विधान केले.

या वक्तव्यामुळे ट्रम्प यांच्या प्रकृतीवरून नवा वाद पेटला.

सोशल मीडियावर “ट्रम्प वारले” अशा अफवा पसरल्या.

मात्र, या अफवांवर व्हाईट हाऊसने शिक्कामोर्तब केले नाही.

उलट, जेडी व्हान्स यांनीच स्पष्ट केले की, “ट्रम्प पूर्णपणे निरोगी आहेत.

ते सकाळपासून रात्रीपर्यंत उत्साहाने काम करतात.”

सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प हे सध्या ७९ वर्षांचे असून अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत.

त्याउलट, जेडी व्हान्स हे फक्त ४१ वर्षांचे असून

अमेरिकेच्या इतिहासातील तिसरे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

अफवा मात्र कायम चर्चेत

जुलै महिन्यात देखील ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत अशीच चर्चा रंगली होती.

मात्र, सध्याची “Trump is Dead” ही अफवा जगभर चर्चेत आली

असून ट्रम्प यांच्याबाबत खरे-खोटे समजून

घेण्यासाठी लोक सोशल मीडियाकडे धाव घेत आहेत.

Read also : https://ajinkyabharat.com/khadhemaya-rastyavarun-shetkyanchi-tarevarchi-workout/