मंगरुळपीर (जि. वाशिम) | प्रतिनिधी : फुलचंद भगत
संभाजीनगर–नागपूर द्रुतगती मार्गावरील पेडगाव येथे रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला.
सिंध ट्रॅव्हल्सची पुण्याहून कारंजा कडे जाणारी लक्झरी (MH 37 W 7772)
आणि नागपूरहून संभाजीनगरकडे जाणारा ट्रक (CG 04 MH 0391) यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच खडबड उडाली. गंभीर जखमी ६ जणांना तत्काळ उपचारासाठी कारंजा,
शेलुबाजार आणि वाशिम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित १५ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
108 अॅम्बुलन्सच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या अपघातात लक्झरी बस चे चालक अशोक वानखडे यांना तसेच ट्रकच्या चालका लाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून मदत आणि वाहतूक नियंत्रणाचे काम सुरु आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/hey-bapre-alf/