‘येक नंबर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची सोशल मीडियाव

जोरदार चर्चा आहे, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘येक

नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात

Related News

पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बॉलिवूड

अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष

गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद

खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित

झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता होती. आता

अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य

प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या

चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका

आहेत. ‘येक नंबर’ या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट राज

ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आपली

प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन

येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य

कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. ट्रेलरमध्ये

प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास

दिसत आहे. प्रताप त्याचं ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाचं

उत्तर येत्या 10 ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळेल. ट्रेलरमध्ये राज

ठाकरेंचा उल्लेख, त्यांचा फोटो, ‘शिवतीर्थ’ या सगळ्यांची झलक

पाहिल्यानंतर आता चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार

आहेत का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

‘येक नंबर’म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असं

मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असेल हे ट्रेलर पाहिल्यावर स्पष्ट होतंय.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-pune-visit-canceled/

Related News