ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार.

ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार.

डाबकी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रॅक्टरच्या धडकेत १८ वर्षीय युवकाचा मंगळवारी

उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलिस ठाण्यात

ट्रॅक्टर जप्त करुन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related News

डाबकी रोड परिसरातील गजानन नगरमध्ये राहणारा १८ वर्षीय सागर

खंडारे हा युवक त्याच्या मित्रासोबत दुचाकीने डाबकी रोडवरुन जात होता.

दरम्यान, निष्काळजीपणाने वाहन चालविणाऱ्या एमएच ३० बीएल ८६३६ क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने सागर

खंडारे याला धडक दिल्याची घटना ३ मार्च रोजी दुपारी घडली होती.

जखमी अवस्थेतील सागर आणि त्याच्या मित्राला रुग्णालयात दाखल केले असता,

सागर खंडारे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी

डाबकी रोड पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Read more news here :

https://ajinkyabharat.com/or-asaa-kadya-ghaloon-raj-thackeray-pahar-adar-response/

Related News