प्रयागराजच्या महाकुंभात डॉक्टर बाबा आर्तत्राण यांच्या चमत्कारिक उपचारांची चर्चा रंगली आहे.
उडीशा येथील रहिवासी असलेले हे बाबा टच करून आजार बरे करण्याचा दावा करतात.
ते 2011 पासून “दिव्य उपचार” करत असल्याचे सांगतात आणि 30 लाखांहून
Related News
ठाणे-कल्याणमध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;
बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांची पाकिस्तानातून सुरक्षित वापसी
कान्समध्ये उर्फी जावेदचा डेब्यू उधळला;
शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;
“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…
जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करावं की विकावं
अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
“सीजेआय पदाची शपथ घेण्याआधी आईचं आशीर्वाद घेतलं”
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
अधिक लोकांचा उपचार केल्याचा दावा करतात. प्रयागराजच्या भूमीत महाकुंभ सुरू आहे.
या महाकुंभमध्ये साधू, संत आणि बाबांनी हजेरी लावली आहे. अनेक प्रकारचे बाबा या महाकुंभात आले आहेत.
त्यातील काही रुद्राक्ष बाबा आहेत. काही सायकलवरून आले आहेत.
कुणाच्या डोक्यावर कबुतर आहे, कुणाच्या डोक्यावर शिवशंकराची भव्य प्रतिमा आहे.
एक बाबा तर आयआयटी बाबा आहे. दुसरा एमटेक बाबा आहे. आता तर कुंभमध्ये आणखी एक बाबा अवतरला आहे.
डॉक्टर बाबा म्हणून हा बाबा फेमस आहे. टच करून आपण लोकांना बरे
करत असल्याचा दावा या बाबाने केला आहे. एवढेच नव्हे तर
हवं तर माझ्यावर रिसर्च करा, असं आव्हानच या बाबाने दिलं आहे.
बाबा आर्तत्राण असं या बाबाचं नाव आहे. उडीसा येथील भुवनेश्वरचा तो रहिवासी आहे.
महानिर्वाणी अखाड्याबाहेर बाबांचा कॅम्प असलेल्या ठिकाणी श्रद्धाळूंची मोठी गर्दी जमली आहे.
देवाचा आशीर्वाद आणि मंत्रांची शक्ती वापरून असाध्य रोगांचा उपचार करू शकतात,
असा दावाच या आर्तत्राण बाबाने केला आहे.
2011 पासून आपण “डिवाइन ट्रीटमेंट” देत आहोत आणि आतापर्यंत 30 लाखांहून
अधिक लोकांचा उपचार केला आहे. फक्त भारतातच नाही, तर विदेशातही आपली दैवी शक्ती वापरून लोकांचे रोग बरे केले आहेत. आपल्या मंत्रांमुळे लहान रोगांपासून ते गंभीर रोगांपर्यंत उपचार होऊ शकतात, असं या बाबाचं म्हणणं आहे.
याबाबाने मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी हा दावा केला आहे.
मेडिकल सायन्स न वापरता, लोक 120 वर्षांपर्यंत जिवंत होते. माझ्यावर संशोधन होणं आवश्यक आहे,
कारण मी अशा रोगांचा उपचार करतो जो मेडिकल सायन्सच्या नियंत्रणात येत नाही, असंही या बाबाने म्हटलं आहे.
महाकुंभमध्ये आलेले भाविक बाबांना भेटतात आणि आपले आजार त्यांना सांगतात.
बाबाही आधी रुग्णांना आजार काय आहे हे विचारतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/team-indianla-mohammed-shamichi-thunder/