Credit Card ब्लॉक म्हणजे खाते बंद नाही! RBI नियमांनुसार महत्त्वाची माहिती
आजकाल बहुतेक लोक रोजच्या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. मात्र, कार्ड ब्लॉक करणे, निष्क्रिय करणे आणि पूर्णपणे बंद करणे यातील फरक अनेकांना समजत नाही. अनेक जण असे समजतात की कार्ड एकदा ब्लॉक केलं की ते आपोआप बंद झालं. पण आरबीआयचा नियम अगदी वेगळं सांगतो.
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे म्हणजे खाते बंद करणे नाही. कार्ड ब्लॉक केल्यास तुम्ही नवीन व्यवहार करू शकत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. तुमचं कार्ड खाते बँकेकडे मात्र सक्रिय राहते. कार्ड नंबर, खाते आणि संबंधित डेटा सिस्टममध्ये सुरूच असतो. त्यामुळे जर आधीची थकबाकी असेल, EMI सुरू असतील किंवा एखादं शुल्क लागू होत असेल तर त्या सर्व गोष्टी चालूच राहतात. विलंब शुल्क, व्याज आणि वार्षिक शुल्क आकारलं जाऊ शकतं. याचा थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवरही होऊ शकतो.
Related News
ब्लॉक म्हणजे काय?
कार्ड वापरून खरेदी, पैसे काढणे किंवा ऑनलाइन पेमेंट करता येत नाही. मात्र तुमचं खाते बंद होत नाही. बँक आणि ग्राहक यांच्यातील करार कायम राहतो. थकबाकी भरली नाही तर खाते थकीत दाखवलं जाऊ शकतं.
कार्ड बंद म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही कार्ड बंद करण्याची अधिकृत विनंती करता, तेव्हा तुमचं कार्ड खाते कायमचे बंद होतं. बँक आणि तुमचा करार संपतो. पुढे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँकांनी ग्राहकाची विनंती मिळाल्यानंतर वर्किंग डेजमध्ये कार्ड बंद करणे बंधनकारक आहे. जर काही थकबाकी असेल तर ती भरेपर्यंत बंद करण्याची मुदत सुरू होत नाही. पेमेंट पूर्ण केल्यानंतर साधारण ७ कामकाजाच्या दिवसांत बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर बँकेला ही माहिती CIBIL, Experian, CRIF, Equifax यांसारख्या क्रेडिट ब्युरोकडे पाठवावी लागते.
कोणती मोठी चूक लोक करतात?
बहुतेकजण कार्ड ब्लॉक करून बेफिकीर होतात आणि खातं बंद केल्याचं समजतात. काही महिन्यांनी त्यांना विलंब शुल्क, व्याज किंवा वार्षिक शुल्क आकारलेलं दिसतं. CIBIL report मध्ये खाते “Active” दिसल्याने नवीन कर्ज किंवा कार्ड नाकारलं जाऊ शकतं.
कार्ड कधी ब्लॉक करावे?
कार्ड हरवलं असेल
फसवणुकीचा संशय असेल
काही काळ वापरायचं नसेल
कार्ड कधी बंद करावं?
वार्षिक शुल्क जास्त असेल
कार्ड नको असेल
जास्त कार्ड असल्याने क्रेडिट एक्सपोजर कमी करायचं असेल
कार्ड बंद करण्याच्या पायऱ्या
कस्टमर केअरला कॉल करून बंद करण्याची विनंती करा.
थकबाकी त्वरित भरा.
बँकेकडून क्लोजर कन्फर्मेशन ईमेल घ्या.
7 कामकाजाचे दिवस वाट पाहा (पेमेंट नंतर).
कार्ड कापून नष्ट करा – चिप आणि स्ट्रिप तोडून टाका.
CIBIL रिपोर्टमध्ये खाते “Closed” दाखवलं आहे का ते तपासा.
लक्षात ठेवा – ब्लॉक म्हणजे सुरक्षा उपाय, बंद म्हणजे कायमची समाप्ती. दोन्हींमध्ये फरक समजणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर नुकसान तुमच्या खिशाला आणि CIBIL स्कोअरला होऊ शकतं.
read also : https://ajinkyabharat.com/sister-fight-for-imran-khan-story-of-uzma-rubina-alima-and-rani/
